
चंद्रपूर :- झपाट्याने होणारे तापमान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक चिंतेचा विषय असून यावर प्रभावी रित्या मात करण्यासाठी पर्यावरण रक्षणासोबतच पर्यावरण स्नेही उद्योग व रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बांबू तंत्रज्ञ आणि उद्योजिका अन्नपूर्णा -धुर्वे बावनकर यांनी केले. त्या बांबूटेक ग्रीन सर्विसेस, बांबू आर्ट अँड नेचर सोसायटी आणि हिरव सोनं बांबू कारागीर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू लागवड जनजागृती उपक्रमाच्या निमित्त जांभर्ला रोड, चिचपल्ली येथील बांबूटेक च्या आवारात आयोजित बांबू लागवड कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी बांबूटेकचे संचालक अनिल दहागावंकर, निलेश पाझारे, राजेश भलमे, बांबु शेतकरी लक्ष्मी नंदनवार, युवा बांबू अभ्यासक व इंटेरिअर डिझायनर भूषण नंदनवार, जेष्ठ बांबू कारागीर भुजंग रामटेके, निकेश बावणे, बांबू तंत्रज्ञ घनश्याम टोंगे, श्वेता बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अन्नपूर्णा धुर्वे म्हणाल्या की खऱ्या अर्थाने हिरवं सोनं असलेल्या बांबू मुळे उद्योग, रोजगार, आर्थिक व सामाजिक क्षेत्र सुद्धा सकारात्मक आणि शाश्वत रित्या बदलू शकते परंतु याबाबत व्यापक प्रमाणात सर्व स्तरावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
यावेळी अनिल दहागावंकर यांनीही बांबूचे विविध महत्व विशद करून बांबू लागवडीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासक, तंत्रज्ञ आणि संशोधकांनी वैज्ञानिक व संशोधनपर माहिती शेतकरी व जनतेपुढे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बांबूटेकचे पर्यवेक्षक भास्कर शेरकी, सुरज सोनारकर, सागर धुर्वे, बांबू कारागीर मनोज नैताम, रुपेश हजारे, रोशन जुमडे, अजय हजारे, महेश मरस्कोल्हे,ध्रुवदास मंडरे, विशाल बावणे, प्रज्वल बावणे शुभम मंडरे, सौरव मंडरे , प्रणित मारटकर, साईनाथ रणदिवे यांनी परिश्रम घेतले.
