ताडोबा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन

0
635

चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दि. 5 जून 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता पासून तर सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मोहर्ली सभागृहात घेण्यात आले.

रक्तदान शिबिर घेण्याचे मुख्य उद्देश म्हणजे मागील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सेवा देणारे क्षेत्र सहायक विलास कोसनकर, वनरक्षक पवन मंदुलवार, विनायक पवार, पवन देशमुख, सुनीता मट्टामी वन्यजीव विभागात चार – पाच वर्षे सेवा पुर्ण होऊन बदली व पदस्थापना प्रादेशिक विभागात झाल्याने यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यटक, मार्गदर्शक, जिप्सी मालक-चालक, होमस्टे / रिसोर्ट चालक, कर्मचारी वृंद यांच्याशी स्नेह, ॠणानुबंध, प्रेम-प्रतिष्ठा चिरकाल टिकून राहण्यासाठी रक्तदान – श्रेष्ठदान राष्ट्रीय कार्यात सहभागी म्हणून विशेष तसेच जागतिक पर्यावरण दिना निमीत्त बी वाटप करण्यात आले व बी पेरणी करून पर्यावरण संतूलना करीता सिंहाचा वाटा म्हणून प्रोत्साहीत करण्यात आले.

रक्तदान म्हणजेच जीवनदान
रक्तदान करताना शरीरात अशक्तपणा येईल, अशी भीती लोकांच्या मनात असते, पण तसे नाही.
रक्तदान करणे पूर्ण पणे सुरक्षित मानले जाते. रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्याचे काम तुम्ही करत आहातच, पण तुमचे आरोग्य देखील  सुधारते. रक्तदान करणाऱ्याचे रक्तदाब आणि वजन दोन्ही नियंत्रणात राहते व  कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. एका व्यक्तीच्या शरीरात सरासरी 10 युनिट (5-6 लीटर) रक्त असते. त्यापैकी फक्त 1 युनिट रक्त घेतले जाते.
या वेळेस कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर,  अध्यक्ष नंदकिशोर काळे उपसंचालक (कोर ) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, प्रमुख अतिथी सौ.सुनीता कातकर, सरपंच गट ग्राम पंचायत मोहर्ली, डॉ. बोबडे, वैद्यकीय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र मुधोली), रमेश चौव्हाण आरोग्य सेवक उपकेंद्र मोहर्ली, आभार प्रदर्शन महेश खोरे सहाय्यक वनसंरक्षक (कोर) यांनी केले.


सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यास अरुण गोंध वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (कोर), सतीश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी (ताडोबा), वनरक्षक पवन मंदुलवार, जनबंधू, एस. ए. महाजन, पी. व्ही. टेकाम,  यांनी केले व मोठया संख्येने पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी चालक-मालक यांनी रक्तदान केले व तसेच होमस्टे असोसिएशन, नाहीद सिद्दिकी, आशिष पुरानिक, सुलेमान बेग, सार्ड संस्थाचे मंगेश लाहमगे, संजय जावडे आदि उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here