
तळोधी बा. :
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र येथे आज नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. कडनोर मॅडम यांनी आज कार्यभार घेतला व आज दि. 01 जून 2022 रोजी अतिरिक्त कार्यभार असलेले के.आर. धोंडणे यांनी त्यांना तळोधी बा. वन परिक्षेत्राचा कार्यभार सोपविला.
यावेळेस वर्षभरापासून अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे के. आर. धोंडणे यांना ‘स्वाब नेचर केअर’ संस्थे सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला व आज पासून नव्याने कार्यभार सांभाळणारे सौ.एस. एस. कडनोर मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना समोरील कार्यकाळा बद्दल शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले. के.आर.धोडणे यांनी सुध्दा कडनोर मैडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना समोरील वाटचालीत करीता शुभेच्छा दिल्या.
यावेळेस ‘स्वाब’ नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष कायरकर , सदस्य महेश बोरकर, जिवेश सयाम आदि उपस्थित होते.
