
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी कुटीवर दि. 17 मई 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास फायर वॉचर निलेश आत्राम वय (22) वर्ष राहणार रानतळोधी याला सापाने चावा घेतले असल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेत मजूर झिंकानाट-1 बिटातील असून तो अंधारी कुटीवरील फायर कॅम्पला मुक्कामाने हजर असता त्याला सापाने चावा घेतला.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच ए.सी.एफ. कुलकर्णी , वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णापुरकर मॅडम, क्षेत्र साहाय्यक यादव, रानतळोधी, काकडे वनरक्षक झिंकानाट-1 यांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन जखमी मजुराला शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
