जंगल सफारीच्या आरक्षण करण्याकरिता ताडोबाच्या नावावर बनावट संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची फसवणूक

0
622

चंद्रपूर :- ताडोबा मध्ये जंगल सफारीच्या करण्याकरिता पर्यटकांची गर्दी नेहमीच जमलेली असते सफारी तिकीट मिळण्याकरिता वेबसाईट चेक करतात त्यात सफारी आरक्षणाचे बनावट संकेत स्थळ तयार करून एका पर्यटकाला लुटले गेले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सदर घटने संबंधी ताडोबा प्रशासनाने सायबर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आले असल्याचे ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी करिता पर्यटकांनी ताडोबा बुकिंग डॉट इन (tadoba booking.in) या संकेत स्थळावर जाऊन आरक्षण केले त्यांनी जुनोना प्रवेशद्वारा ची आरक्षण करून सफारीचे ऑनलाइन पैसे भरले त्यानंतर ऑनलाईन संकेत स्थळा वरून एका त्रयस्त व्यक्तीने त्या पर्यटकांना जुनोना ऑनलाइन फुल झाले असल्याचे सांगितले तुम्हाला तुमचे ऑनलाईन भरलेले रक्कम परत मिळेल असेही सांगण्यात आले व पुन्हा त्या पर्यटकांना मामला गेटचे आरक्षण सुरू असल्याचे सांगितले व त्या गेटच्या आरक्षण करा असा सल्ला त्यांना देण्यात आला परंतु पर्यटकांनी जंगल सफारीचे आरक्षण रद्द केले.
मात्र त्यांना त्यांचे भरलेले पैसे परत मिळाले नाही वारंवार फोन करुन ही थोडा धीर धरा पैसे जमा होतील असे वक्तव्य त्रयस्त व्यक्ती करत होता. पैसे जमा न झाल्याने पर्यटकाने समाज माध्यमावर ही माहिती जाहीर केली.
याची माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक कार्यालयात होतात क्षेत्रसंचालकांनी सायबर पोलिसांना बनावट संकेत स्थळाद्वारे पर्यटकांची फसवणूक होत असल्याची तक्रार दिली आहे.
my tadoba.org हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ आहे. ताडोबा सफारी करिता मध्यस्त तसेच पूर्ण सफारी आरक्षित करून देण्याचे दावा करणारे व बनावट संकेत स्थळ तयार करून पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या पासून सावधान रहावे असे आव्हान डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे तसेच फसवणूक करणाऱ्या संबंधित आठ आरक्षित संकेतस्थळावर कारवाई करावी यासाठी पोलिस तक्रारीत मागणी केले असल्याची माहिती डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here