गडचिरोली :- शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरमोरी तहसील मध्ये आता वाघाची दहशत दिसून येत आहे. आरमोरी तहसीलला लागून असलेल्या देसाईगंज तहसीलच्या उसगाव परिसरात वाघाने 2 जणांना ठार केले होते. आता आरमोरी तालुक्यातही वाघाने आपली दहशत निर्माण केली आहे.
आरमोरी शहर समीपस्या अरसोडा गावातील शेताच्या आवारात शेतात पाणी घालण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्यावर दि. 13 मई 2022 रोजी शुक्रवारी सकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते. ही घटना ताजी असतांना दुसऱ्या दिवशी , दि.14 मे 2022 शनिवार रोज सकाळी 7.30 च्या दरम्यान सीताबर्डी येथील नंदू गोपाला मेश्राम वय (50) वर्ष असून तो शेतात उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता वाघाने त्यांचावर हल्ला करून जागीच ठार केले आहे.
या दोन्ही घटना आरमोरी तहसील मुख्यालयापासून काही अंतरावर घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेली आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच विविध राजकीय पक्षांनीही वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे केली आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावे व वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.