परिसरातील शेत शिवारा लगत वाघीण व तिच्या एका बछड्याचे वास्तव, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वनविभाग व ‘स्वाब’ सदस्यांची गस्त

0
197

तळोधी (बा) : तळोधी बिटातील बोकोडोह नदीतून ५ कि.मी. पायदळ गस्त करण्यात आली. परिसरातील शेत शिवारा लगत वाघीण व तिच्या एका बछड्याचे वास्तव, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वनविभाग व ‘स्वाब’ नेचर केअर संस्था चे सदस्यांनी ही गस्त केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी सावध राहण्याचे  आवाहन व मार्गदर्शन केले .  या भागात सध्या वाघीण व तिच्या एका बछड्याचे  वास्तव भ्रमंती सुरू आहे. व  या भागातील शेतकरी किंवा  गुराखी यांना या वाघीण च्या परिवाराचे रोजच दर्शन होते आहे.

त्यामुळे कोणत्याही शेतकरी, शेतमजुरां सोबत काही अनुचित प्रकार घडू नये, व या संबंधीची माहिती त्या परिसरातील शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना गस्ती दरम्यान देऊन, त्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वनविभाग व ‘स्वाब नेचर केअर संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सप्ताह भर हि गस्ती पळसगाव (जन) – ओवाळा – लखमापूर- तळोधी – सावर्ला  या परिसरात असलेल्या बोकडोह नदी – नाल्यात व शेतात सुरू आहे.
यावेळी  वनरक्षक एस. बी. पेंदाम साहेब,  वन कर्मी, व  ‘स्वाब’ नेचर केअर संस्था चे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य महेश बोरकर, प्रशांत सहारे, वेदप्रकाश मेश्राम, विकास बोरकर, सचिन निकूरे, जिवेश सयाम, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here