लाखनी वनपरीक्षेत्रातील उमरझरी येथे चितळाचे मृतदेह चमडा काढलेला आढळला ; दोन आरोपींना अटक

0
712

भंडारा :- वनविभाग भंडारा अंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील , सहवनक्षेत्र – उमरझरी , नियतक्षेत्र – उमरझरी येथील मौजा – उमरझरी येथे दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी वन्यजीव विभाग STPF च्या कर्मचाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.०० वाजता च्या सुमारास मौजा उमरझरी कक्ष क .१०१ ला लागुन क्षेत्र  शंकर तुकाराम पंधरे रा .उमरझरी यांच्या शेतालगत नाल्यामध्ये  चितळ मृत अवस्थेत चमडा काढलेल्या अवस्थेत आढळुन आले असून  या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वनविभागाच्या डॉग स्कॉड पथक साकोली यांचे मदतीने आरोपी राजकुमार शिवराम वाढई वय ४९ वर्षे रा . उमरझरी व रामकृष्ण सोमा सोनवाने वय ५२ वर्षे रा . उमरझरी पकडण्यात आले आहे.  तपास दरम्यान आरोपींना घटनास्थळी आणून चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबुल केला. आरोपीवर वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली आहे . तपास दरम्यान  आरोपींनी आज दि .०२ मे २०२२ रोजी न्यायदंडाधिकारी ( प्रथम श्रेणी ) साकोली यांच्या समक्ष हजर करण्यात आले व  त्यांना न्यायालयाने १२ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्यांना मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे नेण्यात आली .
सदर प्रकरणाचे तपास राहुल गवई उपवनसंरक्षक , भंडारा वनविभाग भंडारा तसेच आर . पी . राठोड सहाय्यक वनसंरक्षक साकोली यांचे मार्गदर्शनाखाली एस . पी . गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी हे करीत असुन सदर कारवाही दरम्यान वाय . एस . तांडेकर क्षेत्र सहा . उमरझरी तसेच आर . डी . कोदाने बिट रक्षक उमरझरी तसेच एन.बी. उशीर बिटरक्षक चांदोरी, आर . बी . पडोळे बिटक सोनेगाव हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here