वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

0
675

यश कायरकर
मूल तालुक्यातील मारोडा गावातील एका इसम वर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दि. ३० एप्रिल २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेतील मृतकाचे नाव  गजानन गुरनूले वय 60 वर्षे रहिवासी मारोडा असे आहे.
मृतक गजानन नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चरावयास गेला होता. संध्याकाळच्या वेळीस गावातील सर्व बैल घरी परत आले पण बैल राखणारा गजानन परत न आल्याने  परिवारातील सदस्याने शोधाशोध
सुरुवात केली. काही वेळा नंतर जिथे तो बैल चारावायला गेला त्या शेतात रात्री 8.30 च्या दरम्यान  त्याची  टोपी व थोड्या अंतरावर त्याचा ढोतर सापळला. त्याच दिशेनं शोधत सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगर देवीच्या  जवळ गजानन चे मृतदेह सापळला.

सदर घटनेची माहिती वन विभागाला व तसेच पोलीसाना  देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहचून पंचनामा केले.
सघ्या मारोडा गावाच्या शेतशिवारात वाघाचे वावर वाढलं आहे. मृतक हा या पूर्वी सुध्या 2021च्या उन्हाळ्याच्या काळात त्याच्यावर वाघाचा हल्ला झाला होता.
मात्र त्या हल्यात  तो जखमी झाला आणि त्याचे प्राण वाचले होते. मात्र दि. 30/4/2022 ला दुपारच्या वेळेस त्याच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यात त्याचा मृत्यू झाला.त्यामुळे  मारोडा गावात पुन्हा एकदा भीतीच वातावरण पसरले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here