
तळोधी बा.
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे असलेल्या लकडा डेपोला (कास्ट भंडार) मला अकरा वाजता परिसरातून गेलेल्या विद्युत विभागाच्या 33 के.वी. व्हाटच्या 11 के.वी. व्हाटच्या दोन्ही तारांच्या झालेल्या स्पार्किंग मुळे सावरगाव नर्सरी मध्ये असलेल्या लकडा डेपो मध्ये ठेवून असलेल्या सोसायटीच्या लाकडांना भीषण आग लागली. या अंदाजे 30 ते 40 ते बिट जळून खाक झाले.
ही आग विद्युत विभागाच्या लापरवाही मुळे च लागुन वनविभाग व लकडा डेपो मध्ये सोसायटी चे लाकुड जळाले असुन फार मोठी नुकसान झालेली आहे. विद्युत विभागाच्या मुख्य 33 केवी व 11 केवी चे इलेक्ट्रिक तार एकमेकांच्या जवळ जुळूनच गेलेले आहेत. त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या सुद्धा या तारांना स्पर्श करतात मात्र त्यांची योग्य पद्धतीने कटाई केलेली नसल्यामुळे स्पार्किंग होऊन आग लागलेली आहे.
आगीची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ नागभीड व सिंदेवाही येथील अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्यांना पाचारण केले. सायंकाळी उशिरापर्यंत या गाड्यांनी, व वन विभागाच्या फायर मॅन व मजुरांनी, परिसरातील पी.आर.टी. च्या सदस्यांनी, व स्वाब नेचर केअर च्या सदस्यांनी लाकडांना लागलेली आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सायंकाळ उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचा लाकूड साठा जळून खाक झाला.
त्यावेळी तळोधी बाळापुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोंडणे, नागपूरची वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, स्वाब नेचर केअर संस्था चे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य महेश बोरकर, प्रशांत सहारे, वेदप्रकाश मेश्राम, विकास बोरकर, तळोधी व गोविंदपुर चे क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड, नेरी चे क्षेत्र सहाय्यक रासेकर, वनरक्षक एस.बी.पेंदाम, एस.एस.गौरकर, येथे वनरक्षक उपस्थित होते.
