
तळोधी बा. (यश कायरकर.)
डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती लखमापूर अंतर्गत सौरऊर्जा कुंपण वाटप व सोलर कुंपण कीट किंवा झटका मशीन वाटप करण्यात आली. या वेळी 23 लाभार्थींनी लाभ घेतला.
वन्य प्राणी , रानडुक्कर, नीलगाय, इत्यादी पासून शेत पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव करण्यासाठी वापर करून आपल्या शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी केला जातो.
यावेळी के.आर.धोंडने, वनपरिक्षेत्र अधिकारी तलोधी, आर.एस.गायकवाड, क्षेत्र सहाय्यक तलोधी (अती. कार्य.), सी.एन.रासेकर, क्षेत्र सहाय्यक नेरी, एस.बी.पेंदाम, वनरक्षक तलोधी, एस. एस.कुळमेथे, वनरक्षक गंगासागर हेटी, श्री. प्रमोदजी राऊत अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती लखमापूर, बाजीराव जी निकोडे अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती सावंगी (ब), उषा श्रीरामे, वैशाली गुरनुले, संतोष लोनबले, देवानंद श्रीरामे लखमापूर समितीचे सदस्य, सभासद व लाभार्थी उपस्थीत होते.
