तळोधी (बा.) : शिवनी येथे तेंदूपत्ता व वनवा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सध्या तेंदूपत्ता व मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू होत असल्यामुळे या दिवसात जंगलाला वनवा लागून जंगलाचे व वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतो. सोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे आधीच काळजी घेऊन ‘जंगलात वणवा लागू नये म्हणून काळजी घेण्यास व त्यासंदर्भात उपाय योजना करण्याकरिता वनपरिक्षेत्र कार्यालय शिवनी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
याकरिता परिक्षेत्रातील संपूर्ण पि.आर.टी.चे सदस्य, संपूर्ण वनरक्षक, वन मजूर, व परिसरातील गाईड व यांना सभेत बोलवण्यात आले .
ही सभा वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे साहेब यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडली.
सोबतच संपूर्ण उपस्थित मंडळींच्या भोजनाची यावेळी व्यवस्था करण्यात आली. सहाय्यक उशेंडी व पेंदोर यांनी ही सहकार्य केले.