
चंद्रपूर (सुलेमान बेग):
लॅंटाना उष्ण कटिबंधीय अमेरिकन झुडूप 1800 च्या दशकाच्या सुरुवातीस शोभेच्या वनस्पती म्हणून भारतात आले, बागेतून निघाले आणि संपूर्ण परिसंस्थेत ताबा घेतला आणि आता भारतातील 40 टक्क्यांहून अधिक व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात लॅंटाना बघायला मिळतो.
भारतातील जंगल 712,249 चौरस किमी पैकी सुमारे 300,000 चौरस किमी भारतीय जंगल धोक्यात आले असल्याने शास्त्रज्ञांनी जंगलांचे रक्षण करण्यासाठी अधिवास-उन्मुख व्यवस्थापन, जैवविविधता निरीक्षण आणि पुनर्संचयन-उन्मुख अभ्यासाची तातडीची गरज हायलाइट केले आहे.
अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, भारतातील लँटाना हे मध्य अमेरिकेतील मूळ हवामाना पेक्षा अगदी वेगळ्या हवामानात वाढत आहे.
लँटाना कुरी गवत म्हणून ओळखले जाते, हे गवत सुपीक जमिनीचे नुकसान करते. संशोधनात असे आढळून आले आहे की लँटानाची पाने विष सोडतात ज्यामुळे जमीन नापीक होते आणि आजूबाजूला काहीही वाढू देत नाही.
लँटाना पासून तुम्ही आकर्षक टोपल्या बनवू शकता. त्याचे देठ आणि मुळांमध्ये नक्षीकाम करून आकर्षक रंगीबेरंगी टोपल्या तयार करून बाजारात विकल्या जाऊ शकतात.
लँटानाच्या झुडपातून विविध प्रकारच्या टोपल्या बनवून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करता येते तेव्हा यावर विचार करण्याची गरज आहे.
