दुर्लक्षित बांबू वुमन ऑफ इंडिया – अन्नपूर्णा धूर्वे बावनकर

0
598

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :
जागतिक महिला दिन साजरा करताना अनेक कर्तबगार संघर्षशील आणि शून्यातून विश्व निर्शण करणाऱ्या अनेक महिला दुर्लक्षित राहतात माध्यमे सत्कार व पुरस्कारांपासून त्या दूर राहून आपले कार्य एखाद्या व्रता सारखे सातत्याने करत राहतात अशाच एका कर्तबगार व उद्योगी महिलेचे नाव आहे अन्नपूर्णा धूर्वे बावनकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत पुरुषप्रधान अशा बांबू क्षेत्रात विशेषता बांबू बांधकाम क्षेत्रात इच्छाशक्ती व कठोर परिश्रमाच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथून बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम बांबू बांधकाम या विशेविकरणासह उत्तीर्ण झाल्यानंतर BRTC च्या महत्वकांक्षी व वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू बांधकाम प्रकल्पात प्रकल्प व्यवस्थापक पदावर यशस्वीरित्या कार्य केले मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही काहीतरी वेगळं करावं या हेतूने अन्नपूर्णानी बांबूटेक ग्रीन सर्विसेस ही कंपनी स्थापन केली आणि बांबू बांधकाम, बांबू हँडीक्राफ्ट, बांबू ट्रेडिंग, बांबू फर्निचर, बांबू लागवड या क्षेत्रात कार्य सुरू केले. कोरोना काळात रोजगार गमवलेल्या अनेक बांबू कारागिरांना रोजगार उपलब्ध करून दिला.

आज अन्नपूर्णाच्या कंपनी मध्ये 30 पेक्षा जास्त प्रशिक्षित बांबू कारागीर काम करत आहे तरुण बांबू कारागीर, महिला, शेतकरी यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यावर त्यांचा भर असून त्यांना केवळ प्रशिक्षण नाही तर स्वतःच्याच विविध प्रकल्पामध्ये रोजगार देण्याचे अतिशय महत्वपूर्ण कार्य अन्नपूर्णा करीत आहे.
माध्यमे, सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणाच्या मदती शिवाय अन्नपूर्णाने काळाची गरज असलेल्या पर्यावरण स्नेही अशा बांबू उद्योग क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या  कर्तुत्वाचा ठसा उमटविला असून पुरूष प्रधान बांबू उद्योग क्षेत्रात विशेषता बांबू बांधकाम आणि बांबू ट्रेडिंग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महाराष्ट्रातच नाही तर देशातील एकमात्र आदिवासी बांबू तंत्रज्ञ व उद्योजिका म्हणून अन्नपूर्णा वाटचाल करीत आहे.

आज जागतिक महिला दिनी पर्यावरण पूरक अशा बांबू उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय व रचनात्मक कार्य करणाऱ्या परंतु  दुर्लक्षित असलेल्या अन्नपूर्णा धूर्वे बावनकर या उद्योगिक कर्मठ व परिश्रमी महिलास पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here