प्रसिद्ध उद्योजक विवेक आणि झिता गोयंका यांच्या पुढाकाराने ताडोबाला सुरक्षा वाहन सुपूर्त

0
1001

चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात मानव व वन्यजीव संघर्ष फार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहेत.

अशा वेळेस वाघ व बिबट्यांना जेरबंद करण्यास फार परिश्रम वनविभागाला करावा लागतो वन्यप्राण्यांला डॉट मारणे कधी कधी खूप अवघड होतो तर काही परिसरात जंगलात गाडी जाऊ शकत नाही. अशा वेळेस वनविभागाचा कर्मचाऱ्यांना डॉट मारण्यात खूप त्रास आणि वेळ जातो या सगळ्या बाबी लक्षात घेतात त्यांच्या सुरक्षा करिता देशातील पहिले वाहन तयार करून प्रसिद्ध उद्योजक विवेक आणि झिता गोयंका यांच्या पुढाकाराने हे वैशिष्ट्यपूर्ण शक्तिशाली गाडी दिनांक 14 फरवरी 2022 रोजी शुक्रवारी ताडोबा मध्ये रेस्क्यू त्या कामाकरिता देण्यात आले. या वाहनांची संकल्पना आणि समन्वय वन्यजीव प्रेमी धनंजय बापट यांनी केली सदर कार्यक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली गेट वर घेण्यात आले.
याप्रसंगी धनंजय बापट यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये यांच्या हस्ते वाहनाची चावी देण्यात आली व PCCF यांनी लगेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना दिली.

वाहनांचे वैशिष्ट

15 लाख किमतीचे हे वाहन ताडोबाच्या कठीण चढावावर सहजपणे चाळणारे, खड्या व चिखलातून जाऊ शकणारे हे वाहन 3600 cc चे आहे गाडीचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गाडी पलटी मारली तरी ते सहज सरळ होऊ शकेल अशी व्यवस्था यात करण्यात आली असून वाहनाच्या छपरावर एक गेट आहे वन्यप्राण्यांना डॉट मारण्यास त्याचा वापर करता येईल व लगेच ते बंद करता येईल. वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यास लागणाऱ्या इंजेक्शनला 4 डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये ठेवण्यासाठी एक छोटा फ्रिज गाडी मध्ये लावण्यात आलेला आहे.

यावेळेस रेस्क्यू वाहणाची पूजा मोहर्ली (कोर) चे वनपरिक्षेत्र अधिकारी गोंद व महिला वनरक्षक यांच्या हस्ते वाहनांची पूजा करण्यात आली.
यावेळेस श्रीशदेवधर, कर्नाटक प्रांताचे क्षेत्र संचालक गोगी, दिना रुपदे, विध्येश बापट, ताडोबा RFO शेंडे, RO विलास कोसनकर, RO आकाश मल्लेलवार, वनरक्षक पवन मंदूलवार व अन्य वन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here