वन्यजीव शिकार प्रकरणात वनविभागाचा खबरी निघाला खरा सूत्रधार

0
616

काही दिवसांपूर्वीच भंडारा नागपूर वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करून बिबट्याच्या अवयवासह तोरगाव येथील रंगनाथ मातेरे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ब्रह्मपुरी वन विभागाच्या तपास दरम्यान या प्रकरणात मास्टर माईंड नंदू पिंपळे असल्याचे उघडकीस आले आहे.


वन्यजीवांच्या शिकारीची माहिती देऊन वनविभागाकडून बक्षीस घेणारा खबरी नंदू पिंपळे निघाला खरा सूत्रधार
सदर प्रकरणात ब्रह्मपुरी वनविभागाच्या तपास दरम्यान आरोपी ने बिबट्याच्या अवयव च्या  शिकार प्रकरणात खरा सूत्रधार नंदू पिंपळे असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर लगेच वन विभागाने नंदू पिंपळे यांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार नंदू पिंपळे हा ग्रामीण भागातील नागरिकांना पैशाची आमिष दाखवून वन्य प्राण्यांचे शिकार करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम करीत होता व त्यानंतर याची माहिती तो वन विभागाच्या अधिकाऱ्या कडे देऊन बक्षीस घेण्याचे काम करीत होता एवढेच नाही तर त्याच प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांकडून त्यांच्या सुटकेसाठी देखील रक्कम वसूल करीत होता. असे बरेच प्रकरणात त्याच्या संबंध असल्याचे वर्तवले जात आहे.
पुढील तपास दरम्यान आणखी काय उघड होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here