उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांची पत्रकारांशी उद्धट वागणूक; म.रा.प. संघटनेतर्फे निवेदन देऊन केला तीव्र निषेध

0
357

आलापल्लीतील वाघ मृत्यु प्रकरणातील पत्रकारांना माहिती देण्यास उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांनी केली टाळाटाळ

गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी :  आलापल्ली वनपरिक्षेत्रातंंर्गत येत असलेल्या नेडेर कक्ष क्रमांक १२ च्या जंगल परिसरात १३ फेब्रुवारीला एका वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेसंदर्भात माहिती संकलीत करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांना वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांनी उद्धट वागणूक देवून प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अहेरीच्या वतीने बुधवारी या घटनेचा तीव्र निषेध करीत शिष्टमंडळाच्या वतीने या संदर्भातील निवेदन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना देण्यात आले.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ सह संघटक श्रीधर दुग्गीरालापाटी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रुपराज वाकोडे, अहेरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड, सचिव अनिल गुरनुले, जिल्हा सल्लागार ओमप्रकाश चुनारकर, उपाध्यक्ष अखिल कोलपाकवार, कोषाध्यक्ष अमोल कोलपाकवार, रामु मादेशी, स्वप्नील श्रीरामवार, आशिफ पठाण, प्रशांत ठेपाले, प्रल्हाद म्हशाखेत्री उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी आलापल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या नेडेर जंगल परिसरात एका वाघाचा मृत्य झाल्याची घटना घडली. या घटनेसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रीया घेण्यासाठी वनविश्रामगृह आलापल्ली येथे गेले असता उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी वाघ मृत्यु प्रकरणातील माहिती चौकशी अधिकारी नितेश देवगडे यांच्याकडे असल्याचे सांगितले.

माहिती घेण्याकरिता पत्रकारांनी उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्याकडे गेले असता कामात असल्याचे सांगून अर्धा तास थांबवून ठेवले. देवगडे हे जाणून बुजून टाळाटाळ करीत वेळ वाया घालवत होते. वेळेचे गांर्भीय लक्षात घेत पत्रकारांनी देवगडे यांच्याकडे जावून प्रतिक्रीया देण्याची विनंती केली असता देवगडे यांनी तुम्हाला प्रतिक्रीया देणे बंधनकारक नसल्याचे सांगत उर्मटपने बोलत होते. पत्रकारांना असभ्य उर्मटपणाची भाषा वापरित माझी तुम्ही उलटीसिधी बातमी प्रकाशित केली तरी माझे काही बिघडणार नसल्याचे बोलले. त्यामुळे पत्रकारांनी प्रतिक्रीया न घेताच परत आले.

अशा उर्मट व असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अहेरी तालुका शाखेतर्फे  तीव्र निषेध करित घटना वगळता वनविभागाच्या कुठल्याही बातम्यांना प्रसिद्धी न देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. अशा उद्धटपणे वागणा-या अधिका-यांची शासन सेवेत रुजू झाल्यापासून त्यांच्या प्रत्येक कामाची बारकाईने शहानिशा करावी. उद्धट वागणा-या कर्मचा-यांची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या संदर्भातील निवेदन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षकांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here