भंडारा वन विभागातील भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत रोड डोडमाजरी नियत क्षेत्रांमधील मौजा मथाडी येथील अशोक दसाराम भोंगाळे राहणार अंबाडी यांच्या शेताच्या बाजूला नाल्यालागत दिनांक 28 जानेवारी रोजी वाघ मृतावस्थेत असल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस येताच स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले.
माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. राजूरकर व अधिनिस्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाचे वय अंदाजे पाच ते सात वर्षाचे वयस्क नर वाघ असून त्याच्या नाकातून रक्त प्रवाह सुरू असल्याचे निर्देशनात आले. मृत्यूचे कारण शोधण्याकरिता पोलीस मुख्यालय भंडारा व नवरगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील डॉग स्कॉटला बोलविण्यात आले. तसेच परिसरातील स्थानिकांची गर्दी वाढत होती त्याला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस विभागाला बोलविण्यात आले. वाघाचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी करीत अन्नू विजय वरारकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय भंडारा व इतर चार पशुधन विकास अधिकारी (श्रेणी-1) यांची चमू घटनास्थळी उपस्थित होती.
सदर मृतदेह तपासणी केली असता वाघाचा मृत्यू जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदर मृत वाघाचे सर्व अवयव साबूत असल्याचे निर्देशनात आले. कार्यवाही करताना सायंकाळ झाले असल्याने शवविच्छेदन काल न होता आज 29 जानेवारी ला करण्यात येत आहे.
यावेळेस एस.बी. भलावी उपवनसंरक्षक भंडारा, वसंत जाधव जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, कुमारी पूनम पाटे उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोली, नाईक अभियंता एस.एस. ई. डी. सी. एल., व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी शाहिद खान व नदीम खान, मानद वन्यजीव रक्षक भंडारा, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे प्रतिनिधी, वाय. बी. नागुलवार सहाय्यक वनसंरक्षक भंडारा, रोशन राठोड सहाय्यक वनसंरक्षक साकोली, साकेत शेंडे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगाव, आत्राम सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव साकोली, व्ही.बी. राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा, संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक भंडारा, सचिन नरड वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी. पी.एफ. कोका, तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढील तपास एसबी भलावी उपवनसंरक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनात वाय. बी. नागुलवार सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) भंडारा हे करीत आहे.
सदर प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्याला वनविभागा मार्फत 25000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे व तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन वन विभागा मार्फत करण्यात येत आहे.