चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मागील काही दिवसापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील उद्याने पार्क पर्यटनासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ताडोबा पर्यटनावर अवलंबून असणारे 20 गेटवरील लोकांचा रोजगार, कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पर्यटन दोन वर्ष बंद होत. त्यामुळे सगड्याना संकटाचा सामना करावा लागला. यावेळी जर पर्यटन बंद राहिले तर पर्यटनांवरील ज्याचं उदरनिर्वाह आहे. अश्याचे पुढे काय होईल हा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
या संदर्भात मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार विधानसभा सदस्य समिती प्रमुख, विधिमंडळ लेकलेखा समिती तथा माजी कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र) यांनी मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे.
तसेच पर्यटक मार्गदर्शक संघटना, रिसोर्ट धारक, गट ग्रामपंचायत मोहर्ली, महिला गाईड यांनी देखील मागणी केली आहे.
Home Breaking News ताडोबा पर्यटन सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे यांना मा. सुधीरभाऊ...