आखेर त्या वाघिणीला जेरबंद करण्यास मिळाले वन विभागाला यश

0
601

मागील काही दिवसांपासून पोंभूर्णा तालुक्यातील अनेक गावामध्ये वाघिणीचे हल्ले झाले होते यात तिघांचा मृत्यु तर 15 जणांना जखमी केले होते. सतत होत असलेल्या वाघिणीच्या घुमाकुळ मुळे शेतकरी, शेतमजूर व नागरीकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी शेतातील पिक काढण्याचे काम सुध्दा थांबवीले होते तर काही ठिकाणी वनविभागाच्या बंदोबस्तात मध्ये नागरिकांनी मदत केली. वाघाचे वाढते हल्ले शेतकऱ्यांना घातक ठरल्याने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी शेतमजूरांनी लावून धरली आहे. तसेच वनविभागाने वन कर्मचाऱ्यांना शेतात गस्तीवर ठेवले तसेच पिंजरे लावून पकडण्याचा प्रयत्न देखील केले पण आटोक्यात आला नाही. दिनांक 23 डिसेंबर 2021 गुरूवार रोज पोंभूर्णा चेकआष्टा मार्गावर एका बकरीची शिकार केल्यावर वाघिण् वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकली.

वनविभागाला पट्टेदार वाघिनीला पकडण्यात यश मिळाले. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास.

पोंभूर्णा तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघाच्या हल्ल्याने तेथील परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते अशा वेळेस 23 डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाघिणीने पोंभुर्णा चेक आष्टा गावाजवळ एका बकरीचे शिकार केली. गावकऱ्यांना माहिती होताच वाघिणीला गावकरी एकत्र येऊन पळवून लावले. वाघिण पडता-पडता एका पुलाखाली शिरली पुलाचा पुढील भाग बंद असल्याने वाघिन तिथेच अडकली.

याची माहिती पोंभुर्णा वनविभागाला होतास त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम बोलविण्यात आले काही वेळातच रेस्क्यू टीम पोहोचली. जेरबंद करत असताना रेस्क्यू टीम ने दोन्ही बाजूने रस्ता बंद ठेवलेला होता त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती जवळपास 2 तास रस्ता बंद ठेवण्यात आला होता जमलेल्या गर्दीमुळे वाघिणीला जेरबंद करण्यात अडचण झाली मात्र शेवटी वन विभागाला जेरबंद करण्यात यश मिळाले.

पुढील उपचार व कारवाईसाठी वाघिणी ला चंद्रपूरला
हलविण्यात आले. ही मोहीम उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, क्षेत्र सहाय्यक आनंदराव कोसरे, वनरक्षक पी एस शेंडे, बी एम रामटेके, शितल कुलमेथे, आर.एस. मेश्राम, एस. ए. ढवळे, व्ही. बी. कस्तुरे, पी. एस. दुधबळे, ममता राजगडे व वनमजुरांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here