BHNS च्या वतीने PRT सदस्यांना मानव वन्यजीव संघर्ष संदर्भात प्रशिक्षण शिबिर

0
448

तळोधी (बा.)

दिनांक 21 डिसेंबर ला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे आयोजित मानव वन्यजीव संघर्ष या उपक्रमा अंतर्गत तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत वन्यजीव संघर्ष संदर्भाने संवेदनशील असलेल्या आलेवाही बिटातील जिवणापूर व आलेवाही येथील युवक वर्ग, व PRT सदस्य यांचा शिबिर आयोजित करण्यात आला होता. ह्या प्रशिक्षण शिबिर चे आयोजन घोडाझरी येथे करण्यात आले. त्यात युवक वर्गाला हिंसक प्राण्या पासून कोणती काळजी घावी, सरपन आणणाऱ्या महीलांना वाघ व अन्य प्राणी यांच्या पासून बचाव करण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी, तसेच गुराखी यांना ग्रूप ने गुरे चारण्यासाठी जावे. या पद्धतीची व इतर माहिती सांगितली. यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी चे प्रकल्प तथा सहायक संचालक संजय करकरे सर व सौरभ दंदे यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्तिथ PRT सदस्य मंगेश बोळेवार, अमृत लेंझे जिवणापूर येथील वण समिती अध्यक्ष विनोद मडावी, चौकीदार रामदिन नान्हे, वॉचेर उईके व संपूर्ण युवक वर्ग जिवणापूर व आलेवाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here