
चंद्रपूर येथील मोरगाव विमानतळ लगतच्या शेतशिवारात वाघाच्या बछडा ठार झाल्याची घटना आज दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी उघडकीस आली. मोरवा विमानतळ परिसरातील शिवारात अंदाजे 4 ते 6 महिन्याच्या वाघाच्या बछड्याची मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
दुसर्या मोठ्या वाघाच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने दर्शविला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव साबुत आहे. त्याच्या डोक्यावर मोठ्या जखमा आढळून आल्यात. वनविभाग व NTCA अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाघाच्या बछड्याचा शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.
