वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

0
548

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मानव-वन्यजीव संघर्ष याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत कधी कापूस वेचणारा शेतकऱ्यावर शेतात वाघाचा हमला तर कधी बांबूसाठी गेलेल्या मजूरावर हमला होताना दिसून येत आहे. ही घटना ताजी असताना वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चेक हत्ती बोळी शेत शिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांच्या शेतात धान कापणी सुरू असताना भाऊबीजेसाठी आलेली बहिन कांताबाई रामदास चलाख वय 60 वर्ष असून आपल्या भावाला शेतात धान कापणीचे काम बघण्यासाठी गेली असतात शेताचा पारीवर दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला. हल्ला होताच महिलेने आरडाओरड केल्याने शेतात काम करीत असलेले मजुरांनी महिलेचा आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला.
सदर घटना ही 15 नोव्हेंबर दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात जखमी महिला मूल तालुक्यातील सिंथळा येथील रहिवासी असून जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे दाखल करून उपचार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here