ऑगलेवाडी येथे मांडूळ व कासव विक्री करणाऱ्याना अटक : सातारा वनविभाग यांची कारवाही

0
458

दि.17.10.2021 सकाळी मिळालेल्या गुप्त माहिती वरून काही लोक हे कराड (राजमाची-ऑगलेवाडी) येथे काही जिवंत वन्यजीव मांडूळ व कासव हे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची खात्रीपूर्वक गुप्त माहिती मिळाली.

दुपारी 1.30 वाजता 4 आरोपी हे दोन दुचाकी वरून राजमाची (ऑगलेवाडी) येथे सांज सावली हॉटेल मध्ये जेवण करीत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या.

वनविभागाचे सहाय्य वनसंरक्षक महेश झांजुर्णे , मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनरक्षक विजय भोसले फिरते पथक सातारा ह्यांनी हॉटेल मध्ये आत जाऊन सदर संशयास्पद 4 जणांची तपासणी केले असता त्यांच्या जवळ एका पिशवीत जिवंत कासव , व एका पिशवीत एक जिवंत मांडूळ मिळून आले.
सदर कासव हे इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल (कासव) व कॉमन सॅनड बोआ (मांडूळ) हे प्राणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेड्युल 1 भाग 2 व शेड्युल 4 मध्ये येते.
त्याला पकडणे, बाळगणे, विक्रीकरणे, मारणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे.
असे कोणी इतर करीत असेल तर गोपनीय माहिती 1926 ह्या नंबर वर कळवावी असे आवाहन वनविभागने केले आहे.

सदर प्रकरणी पकडलेले आरोपी – रोहित साधु साठे, वय 20, रा.अकलूज , ता.माळशिरस जि.सोलापूर, प्रशांत रामचंद्र रसाळ , वय 20, रा.रा.अकलूज , ता.माळशिरस जि. सोलापूर, अविनाश आप्पा खुडे ,वय 21, रा.अकलूज , ता.माळशिरस जि. सोलापूर, सुनील तानाजी सावंत , वय 28 , रा.दिवड , ता.माण, जि. सातारा.

सदर चार आरोपी यांना अटक करून  त्यांच्या दुचाकी गाड्या MH 12 DP 3691 स्प्लेनडर व एक विना नंबरची कावास्की बजाज बॉक्सर तसेच 4 मोबाईल संच, दोन जिवंत वन्यजीव प्राणी हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहायक वनसंरक्षक महेश  झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली (POR) गुन्हा  क्रमांक 06/ 2021 दाखल करण्यात आला असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वय अटक करून कलम 9 , 39 , 48अ, 49 , 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील अटक प्रक्रिया  व चॉकशी सुरू आहे.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश  झांजुर्णे , मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे , वनपाल – ए. पी.सावखंडे, बाबुराव कदम , वनरक्षक – उत्तम पांढरे, विजय भोसले, रमेश जाधवर, अरुण सोलंकी, वनपाल कोळे, सचिन खंडागळे , श्रीकांत चव्हाण,  हणमंत मिठारे , सुनीता जादव , दीपाली अवघड , शीतल पाटील , हे सहभागी वनकर्मचारी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here