कोल्हापूर वनविभागने एकाच वेळी इस्लामपूर, कोल्हापूर, सातारा, कराड, ठिकाणी वेगवेगळ्या टीम तयार करून दि.04.10.2021 रोजी पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकले.
सदर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर असे वन्यजीव शेड्युल 1 भाग 1 तसेच मधील वनस्पती , प्रवाळ, वन्यजीव अवयव असे साठा सापडून आला आहे. यात हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्त अंग) -18, समुद्री पंखा / इंद्रजाल(ब्लॅक कोरल) – 19, साळ शिंग (कोल्हा सदररुष कातडे) ह्या सह इतर वनउपज चंदन , डिंक , कोळसा , शिकेकाई, पांढरी मुसळी, नरक्या, बेहडा, कारवाई मध्ये सापडले आहे.
सदर प्रकरणी तीन दुकानावर कारवाई करण्यात आलेली आहे.
महेश राजू शेटे वय 37 वर्ष रा.ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा .
दुकानाचे नाव 1) निर्मल ट्रेडर्स मंगळवार पेठ, कराड
2) निर्मल ट्रेडर्स दत्ता चौक, कराड
जप्त केलेले मुद्देमाल
1) बेहडा कवच 45 पॅकेट
2) शिकेकाई 43 पॅकेट
3) डिंक 8 पॉकेट
4) कोलसा 12 पॉकेट
5) मूसळी (सफेद) 4 पॉकेट
6) गूगल डिंक 12 पॉकेट
7) चंदन 103 नग (वजन 2.187 किलो)
प्र.गु. दि. नम्बर 29 / 2021 दिनांक 04 ऑक्टोबर 2021
कलम भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2) ब अन्वये गुना दाखल करण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झाझुरणे , वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे हे होते.