
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये पर्यटक मार्गदर्शकांचे ग्रेडेशन करण्याकरिता दि. 18 सेप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. तरी ताडोबा (कोर) च्या सर्व पर्यटक मार्गदर्शकांनी परिक्षेकरिता उपस्थित राहण्यास एन. व्ही. काळे उपसंचालक (कोर) यांच्या पत्राद्वारे आदिवासी ग्राम विकास पर्यटक मार्गदर्शक वन्यजीव सरंक्षक समिती यांना सूचना देण्यात आली आहे.
खुटवंडा व मोहर्ली गेट वरील कार्यरत सर्व पर्यटक मार्गदर्शक यांच्या परीक्षेचे स्थळ आगरझरी कॅम्पिंग साईट आणि कोलारा, झरी, पांगड़ी व नवेगांव गेट वरील कार्यरत सर्व पर्यटक मार्गदर्शक यांचे परीक्षेची स्थळ मदनापुर कॅम्पिंग साईट असणार आहेत.
पर्यटक मार्गदर्शकांचा ग्रेडेशन मुळे गाईड शुल्क मध्ये वाढ होणार आहे. परीक्षेत पास होणाऱ्या मार्गदर्शकांचे गाईड शुल्क गाईड शुल्क 500 रू होणार असून नापास होणाऱ्या मार्गदर्शकांचे गाईड शुल्क गाईड शुल्क 450 रू होणार आहे.
