गडचिरोली मुख्यालया पासून 8 किलो मीटरच्या अंतरावर जेप्रा या गावातील एका इसमावर आज दि. 11 सेप्टेंबर 2021 रोज दुपारच्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघड़किस आली.
जेप्रा गावातील एक पुरुष व एक महिला आपल्या शेळ्या घेऊन गावालगत असलेल्या झुडपी जंगलात चराईसाठी गेले असता जवळच दबा धरून बसलेला वाघाने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना उघड़किस आली.
सदर घटनेत मृत्यु झालेल्या 50 वर्षीय व्यक्तिचे नाव गणपत भांडेकर आहे.
या घटनेच्या वेळेस सोबत असलेल्या महिलेने वन विभागाला व गडचिरोली पोलीस ठाणेला माहिती दिली.
जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 14 पर्यंत पोहचलेली आहे. अशा वेळेस या वाघाला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.