पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार ; तीन आरोपी अटकेत १० वाघ नखे व मिशीचे केस जप्त

0
713

पोंभूर्णा :

पोंभूर्णा तालुक्यातील भटाळी गावातील 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत यात 10 वाघ नखे, मिशीचे 6 केस, दात व हाडे आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत.
सदर आरोपींना आणखी काही शिकार केले आहेत का याची पुढील तपास वनविभाग कसून करीत आहेत.
दि. 9 सप्टेंबर रोजी पोंभूर्णा तालुक्यातील भटाळी येथील योगेश तोडासे याला वाघाच्या अवयवांची तस्करी व विक्री करताना बुटीबोरी येथे वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
तसेच त्याच्या सोबत असणारे दोघे श्रीदास कडते वय 30 वर्ष व प्रभाकर तोडासे वय 35 वर्ष हे सर्व भटाळी येथील रहिवासी असून यांना ताब्यात घेतले आहेत.
FDCM च्या जंगल परिसरातील कक्ष क्र. 108 च्या नाल्या जवळ शोध मोहीम करून खोदकाम केल्यास वाघाचे हाड वन विभागाने जप्त केले आहेत. सोबतच करंट लावून शिकार करण्यात आलेले तार पण जप्त करण्यात आले.

सर्व आरोपींना नागपूर येथील बुटीबोरी वनविभागाकडे हलविण्यात आले आहेत.
घटनेची कसून चौकशी केली असता त्यात सदर वाघाची शिकार करंट लावून करण्यात आली होती त्यानंतर वाघाची अवयव नख, दात मिशी काढून त्यांनी त्याला जाळून टाकले होते.
सदर प्रकरण आतून अनेक प्रकार उघडकीस येणार असून यात मोठे रॉकेट जाळ्यात सापडणार असल्याची माहिती आहेत
तसेच या प्रकरणात सिंदेवाहीकड़े वळले असून वन विभागाची एक टीम चौकशी करण्याकरिता सिंदेवाहीला रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here