
आसोलामेंढा तलावातून सावलीकडे येणाऱ्या कालव्यात सोमवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास सहा वन्यप्राणी मृतावस्थेत तरंगताना आढळले. मृत प्राण्यांत एक नीलगाय, तीन रानडुकरे आणि दोन शेळ्यांचा समावेश आहे. घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली. उशिरापर्यंत वनविभाग आणि पोलिसांचे पथक तिथे पोहोचले.
मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे आसोलामेंढा तलाव भरला आहे. आसोलामेंढा तलावातून सावलीकडे येणाऱ्या सात कवाडाजवळ सायंकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना वन्यप्राणी पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी घटनेची माहिची पाथरी पोलिस ठाणे व उपवनक्षेत्र कार्यालयाला दिली.
