आलेवाही जि. प. प्राथ. शाळा येथे वनविभाग व बि एन एच एस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने , मानव वन्यजीव संघर्ष आणि नैसर्गिक साधन संपत्ती संकलणा विषयी प्रदर्शनी
तळोधी (बा.) :
मौजा आलेवाही जि. प. प्राथ. शाळा येथे वनविभाग व बि एन एच एस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व श्री. संजय करकरे सर बी एन एच एस संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली मानव वन्यजीव संघर्ष आणि नैसर्गिक साधन संपत्ती संकलणा विषयी प्रदर्शनी लावण्यात आली त्यात जंगलाचे रक्षण करणे, वन वणवा, प्राण्यांची होणारी शिकार, अवैध वृक्षतोड, अवैध गुरे चराई ,नैसर्गिक साधन संपत्तीचा नुकसान,जंगलातील अतिक्रमण,मोहफुल संकलन, तेंदू संकलन,बांबू संकलन, गावात मुख्य ठिकाणी ब्यानर लावणे इत्यादी विषयावर बि एन एच एस संस्थेचे पदाधिकारी मडावी सर , गोहणे सर व मोहर्ले सर यांनी गावातील लोकांना मार्गदर्शना च्या माध्यमातून माहिती पटवून दिली,या कार्यक्रमाला उपस्थित ,गायकवाड सर (वनरक्षक), बनसोड (पोलिस पाटील), सौ,दिघोरे मॅडम( सी आर पी, बचत गट व ग्राम पंचायत सदस्य, गेडाम व कुळमेथे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती,(अध्यक्ष), सुुरपामा (वन हक्क समिती,अध्यक्ष) , यशवंत कायरकर (वन्यजीव अभ्यासक) पी. आर.टी. सदस्य व वनमजुर आदि उपस्थित होते.