ताडोबा” फक्त नावच पुरेसे आहे..

0
1279

ताडोबा” फक्त नावच पुरेसे आहे..

[लेखन – श्री भूषण कोडमलवार, संचालक – विवेकानंद नेचरो टुरिजम]

महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्य़ातील “ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प” हा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे. “ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी वन्यजीव अभयारण्य” असे या जंगलाचे वर्गीकरण होते. अंधारी ही नदी आहे जी ताडोबा जंगलातून वाहते.
१९५५ पासून या जंगलाच्या संवर्धनासाठी प्रकल्प रूपाने सुरुवात झाली.
बघता बघता आजच्या तारखेला ताडोबा हे जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले.
“तारुदेव” ह्या स्थानिक वनवासी बांधवांच्या श्रद्धा स्थानावरून ताडोबा हे नाव पुढे आले. ताडोबा नावाचं तलाव सुद्धा जंगलात आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प, भारतातील अग्रगण्य वन्यजीव पर्यटन ठिकाणांतील महत्त्वाचे तसेच वाघ दिसण्याचे हमखास जंगल म्हणून ताडोबाची ख्याती आहे. कारणही तसेच येथील व्याघ्र संख्या ही मोठी आणि सतत वाढती आहे, सोबतच बिबट, अस्वल, तडस, रानकुत्रा, मगर, रानगवा, निलगाय, सांबर, हरिण, मोर, रानकोंबडी, साळींदर, घोरपड.. पक्ष्यांमध्ये करकोचा, सुतार, लाल बुड्या बुलबुल, दयाळ, चंदन, किंगफिशर, निळकंठ, टिटवी, कोतवाल, भारद्वाज.. अशा अनेक वन्यजीवांनी समृद्ध असे हे जग विख्यात जंगल आहे.
ताडोबाला बांबूचे जंगल म्हणूनही ओळखले जाते. बांबू मोठ्या प्रमाणावर येथे आहे, तोही उच्च प्रतिचा. सालई, अर्जुन, मोह, तेंदु अशा विविध जंगली वनस्पती आहेत ज्यांचा वनौषधी म्हणून सुद्धा मोठा उपयोग होतो.

नजीकच्या वर्षां मध्ये ताडोबा व्याघ्र पर्यटन हे अधिक प्रसिद्धीस आले याला मुख्य कारण ताडोबातील वाघांसोबतच पर्यटनासाठी लागणार्‍या सोयीसुविधांचा विकास – पर्यटक निवासव्यवस्था, मार्गदर्शन, सफारी बुकिंग, स्वच्छता गृहे, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंगल सायकलिंग, जंगल ट्रेल, नाईट सफारी सारखे नवनवीन पर्यटन सेवा उपलब्ध केल्या.
सोबतच वेगाने वाढणारा रस्ते विकास, पुलांची जोडणी, मोबाईल नेटवर्कचा प्रसार, स्मार्टफोनचा फायदा असे अनेक कारण पर्यटन वाढीसाठी प्रोत्साहनपर ठरत आहेत.

आपल्या महितीस  ६ कोअर झोन सफारी गेट व १७ बफर झोन सफारी गेट द्वारे पर्यटक ताडोबा जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेतात. ताडोबा पर्यटनाचे मुख्यत्वे ४ सफारी झोन तयार केले आहे – मोहुर्ली, झरी – पांगडी, कोलारा, नवेगाव..ह्याअंतर्गत त्या झोन मध्ये येणारे कोअर व बफर सफारी गेट दर येतात.

कोअर झोन/बफर झोन म्हणजे काय

मुख्यत्वे संपूर्ण ताडोबा जंगल हे एकच १७२७ स्क्वेअर किमी चे आहे. त्यापैकी ६२५.४० स्क्वेअर किमी “कोअर” म्हणजे जंगलाचे गाभा क्षेत्र, तसेच उर्वरित ११०० स्क्वेअर किमी हे “बफर” म्हणजे गाभा क्षेत्राला वेढणारे आहे. कोअर क्षेत्रातील मानवी वस्तीचे स्थानांतरण केले आहे व बफर क्षेत्रात आजही ९४ गावे जवळपास १लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे ज्यांना पर्यटनातूनच रोजगार मिळतो.
मुळात कोअर किंवा बफर क्षेत्रातील सफारीमधे व्याघ्रदर्शनात फरक पडतो असे काहीही नाही याला कारण दोन्ही क्षेत्रात कुठलेही भौतिक विभागणी नाही, वन्यप्राणी संपूर्ण जंगलात मुक्त संचार करतात. जंगलाचे संवर्धन आणि पर्यटन व्यवस्थापनाच्या दृष्टीने हि कोअर – बफर अशी विभागणी केली आहे.
विशेषतः व्याघ्रदर्शनामधे वाघांच्या हालचाली कोणत्या भागात आहे, त्यादिशेने सफारीसाठी प्रयत्न होतो जेणे करून दर्शन घडावे आणि पर्यटक आनंदित व्हावे.
ताडोबा जंगलाच्या प्रत्येक सफारी गेट द्वारे वेगवेगळा अनुभव येतो याला कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलाची विवीधता. प्रत्येक भागातील झाडे, फुलझाडे, मातीचा प्रकार, नदी, तलावाचे सौंदर्य हे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक गेट/झोन चा अभ्यास हा वेगळा आहे. ऋतुबदलांनुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यातील सफारीचा अनुभवही बदलतो.

ताडोबाला येणाऱ्या निवासी पर्यटकांसाठी “ओळख ताडोबाची” हा परिचयपर उपक्रम आम्ही सुरू केला जो येथे पहिल्यांदाच प्रयोगात आहे, ज्यामधे पर्यटक ताडोबाला आल्यावर सुरुवातीला
ताडोबा हे नाव कसे दिले?
ताडोबा जंगलाची विशेषता काय?
येथील पर्यटन कसे चालते?
ताडोबातील जैवविविधता?
ताडोबातील आदिवासी  बाधवांचे जीवन?
ह्याबद्दल माहिती दिली जाते, जेणेकरून पर्यटकांना ताडोबाचे महत्त्व कळावे.

ताडोबा सफारी बुकिंग

ताडोबा जंगल सफारी बुकिंग ४ महिने अगोदर सुरू होते. सफारी उपलब्धता हि प्रत्येक गेट ला मर्यादित स्वरूपात असते हे महत्वाचे उदा. मामला गेट ला सकाळफेरीत ६ जिप्सी तसेच संध्याकाळफेरीत ६ जिप्सी सोडल्या जातात, असेच काही गेट ला ३ – ३ प्रमाणे कमी जास्त कोटा निश्चित केलेला असतो. एका जिप्सीत ६ पर्यटकांना फिरण्याची परवानगी मिळते सोबतच एक मार्गदर्शक व वाहन चालक बंधनकारक असतो. एक सफारी ४ तासांची असते.
कोअर झोन आणि बफर झोन चे सफारी शुल्क वेगवेगळे आहेत. ऐनवेळी सफारी उपलब्ध होत नाही, करीता आधीच आपले आरक्षण करून निश्चिंत व्हावे.
दररोज सफारी करिता पर्यटक मर्यादा असते, वेळेवर आलेल्या पर्यटकांना संधी उपलब्ध होत नाही.

ताडोबातील निवास व्यवस्था

येथे अधिकतर खाजगी निवास व्यवस्था आहेत ज्यामध्ये रिजाॅर्ट, हाॅटेल, होमस्टे आहेत. काही शासकीय निवास व्यवस्था सुद्धा आहेत. एसी/नाॅन एसी, टेंट, विला, काॅटेज, बुटिक रूम, सुट, डाॅर्मेटरी सोबतच स्विमिंग पूल, मचान असलेले पर्यायही उपलब्ध आहेत. पर्यटक आपल्या आवडी व बजेटनुसार निवड करू शकतात.

कसे पोहचायचे ?

ताडोबा येण्यासाठी रेल्वेमार्गाने चंद्रपूर हे सर्वात जवळील सोयीचे स्टेशन २८किमी आहे. पर्यायी बल्लारशाह १८किमी, माजरी ३५किमी, वर्धा २.५तास, नागपूर स्टेशन ३तासांवर आहेत. विमानप्रवासाठी नागपूर विमानतळ एकमेव पर्याय ३ तासांवर आहे. रस्ते प्रवास हैद्राबाद हून ३७५ किमी, नागपूर हून १५५किमी, तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि संपूर्ण विदर्भतून उत्तम रस्ते राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेले आहेत.

ताडोबा व्याघ्र पर्यटन मार्गदर्शन 

विवेकानंद नेचरो टुरिजम 9403575975

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here