
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पद्मपूर गेटपासून 3 किमी च्या अंतरावर दिनांक 31 मे 2021 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास वाघाला संचार करत असताना बंडा होमस्टे मालक अरविंद बंडा डब्लू नामक मादा वाघिणीच्या दोन छाव्याच्या संचारा मध्ये अरथळा निर्माण करीत असल्याचा वीडियो शूट करीत असताना वीडियो वायरल झालेला आहे. तसेच आपल्या होमस्टेच्या प्रसार करण्यासाठी वीडियो एडिट करून फेसबुक वर अपलोड केलेला आहे. अशा प्रकार चे कृत्य बरेच वेळा करण्यात आलेले आहे. त्यामुळे असंतोष व समरम तयार झाले आहे. वन हक्का कायदा हे सर्वसामान्य जनतेसाठीच आहे का ? कारण या वन हक्काचे कायदे हे ताडोबा अंतर्गत होमस्टे चे मालक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वारंवार असे प्रकार घडवित असता परंतु प्रशासना कडून त्यांच्यावर कोणतेही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्याचा होमस्टेचे परवानगी रद्द करण्यात यावी
जेणेकरून अशा प्रकारचे कृत्य भविष्यात दुसरा कोणीही करणार नाही अशी तक्रार महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनाचे जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांनी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
या वेळेस तालुका प्रमुख पप्पी यादव,पर्यावरण प्रेमी ,चंदन सपाट, नितीन मडावी, प्रफुल सागोरे आदि उपस्थिती होते.
