
राजुरा :
पोंभूर्णा तालुक्यातील FDCM चिचपल्ली वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या केळझर उपक्षेत्राचे डोंगर हल्दी नियतक्षेत्रात कक्ष क्र. 526 मध्ये सरपणासाठी ( लाकडे) जमा करण्यास गेलेली सुशी येथील वैशाली विलास मांदाडे ही महिला वाघाचे हल्ल्यात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 1 जून 2021 रोजी सकाळी उघड़किस आली. घटनेची माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे वन कर्मचारी,ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले मौका पंचनामा करण्यात आले.
या परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. मानवी हल्ल्यामुळे लोकांमध्ये संतप्त आहेत आणि ग्रामस्थांनी वाघावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
