ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प च्या खडसंगी रेंज मधील गार्ड मोहनीश बोरकर यांनी रपटे बनविण्याचे नावावर कंपार्टमेंट क्र. 44 मध्ये रेती व तसेच कंपार्टमेंट क्र. 52, 53, 54 व 55 मधील मुरुमाचे अवैघ रित्या उत्खनन करून परिसरातील गावात विकत असल्याचा आरोप प्रकृती फाउंडेशन, चंद्रपूर अध्यक्ष दिपक दिक्षित यांनी दिनांक 28 मई 2021 रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचे वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्याकडे दीपक दीक्षित यांनी तक्रार केली.
तसेच तक्रार मध्ये त्यांनी दिनाक 27 मई 2021 रोजी गार्ड मोहनीश बोरकर यांनी अवैध रित्या 10 ट्रॅक्टर रेती काढून झरी गावात विकली गेली असे म्हटले आहे.
लाखो रुपये खर्च करून पर्यावरण वाचविण्याचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारचे उत्खनन झाल्यास वन्यप्राण्याना धोखा असतो तसेच झाडाचे मुळ खुले झाल्याने झाड़ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वन समाचार चे प्रतिनिधि यांनी खडसंगी बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्याशी फोन वर संपर्क साधल्यास त्यांनी पर्यटन रस्तावरील गड्डे बुजविण्या करिता व पर्यटन रस्ते दुरुस्त करण्याकरिता आम्ही जंगलातील रेती व मुरूम वरिष्ठांच्या परवानगीने करत आहो आणि ज्या परिसरात काम सुरु आहेत तिथून 9 किलोमीटर पर्यंत गाव नाही आहे अशा वेळेस आम्ही रेती व मुरूम विकणे शक्य नाही आणि गावकरी काही विकत घेत नाही है आरोप खोटे आहे असे ते म्हणाले.