
काही दिवसा पूर्वी वाहनाच्या धडके ने अपघातात बिबट व चितळ मृत्यू झाल्यानंतर ताडोबा प्रशासन उशिरा झोपेतून जागे झाले असून या अपघात प्रवण वाटेवर नुकतेच गतिरोधक लावण्यात आले आहे.
काही परिसरात गतिरोधक नसल्यामुळे अनियंत्रित वेगात वाहने चालविल्या जातात परिणामी अनेक वन्यजीवांचा नाहक बळी जातो. या आधी सुद्धा असे अनेक प्रकार मोहर्ली पद्मापूर दरम्यान झालेले आहे.
या संदर्भात ताडोबा प्रशासन आणि वेळोवेळी सतर्क व तत्पर राहून वेळीच लक्ष घालने आवश्यक आहे परंतु ताडोबा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारंवार असे प्रकार आज पर्यंत घडत आलेले आहे म्हणूनच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने व्याघ्र प्रकल्पातील सर्वच प्रमुख रस्त्यावर गतिरोधक लावणे गरजेचे असून सोबतच या मार्गा वरील वाहनाच्या गति बाबत कडक नियमांचे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
