
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर परिक्षेत्रातील जामनी येथील चितळ स्थलांतर केल्याची चौकशी साठी चंद्रपुर येथील प्रकृति फाउंडेशन के अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा NTCA चे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागितला आहे.
सदर प्रकरणी 19 मई 2021 रोजी NTCA चे DIG राजेंद्र गरवाइ ने वस्तुस्थितीचा अहवाल मागितला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये हा दुसरा प्रयत्न होता, या आधी फेब्रुवारी 2020 मध्ये ताडोबा चे वन संरक्षक एन. आर. प्रवीण ने प्रयत्न केले होते प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या कडून परवानगी देण्यात आले नाही. तरी देखील त्यावेळेस 100 चीतळ जामनी ते बोटेझरी मध्ये स्थलांतरित करण्याचा काम सुरू करण्यात आला होता. त्या दरम्यान चीतळ मरण पावले अशी ही चर्चा शुरू आहे. वनविभागाचे अधिकारी हे खोटे असल्याचे सांगत आहेत.
सदर प्रकरणी NTCA ने संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी असे चंद्रपूर जिल्ह्याचे वन्यजीवप्रेमी वन समाचार च्या प्रतिनिधि सोबत बोलतांना सांगितले.
