गडचिरोली नजीक वाघाचा हल्ला …

0
400

गडचिरोली (रामु मादेशी)

गडचिरोली शहरालगत असलेल्या ६ किमी अंतरावरील वाकडी-मसली मार्गावरील पूलाच्या बाजूच्या शेतात चरत असलेल्या बैलावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 2.45 च्या सुमारास घडली आहे. यामुळे वाकडी म्हसली परिसर पून्हा एकदा वाघाची दहशती खाली आले आहे.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला बैल हा म्हसली येथील रुमाजी राऊत या शेतकऱ्याचा असून त्याची किंमत 10 ते 15 हजाराच्या दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे.
म्हसली येथील शेतकरी विठोबा झरकर हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार ते वाकडी वरून म्हसली येथे मोटर साईकिलने जात होते. पुलाच्या जवळ जाताच त्यांना बैलांचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी मोटरसाईकिल थांबविली व काय झाले हे शोधण्याचा प्रयत्न करीत असताना एक मोठा पट्टेदार वाघ त्याची उंची जवळपास माणसाच्या कंबरभर म्हणजे अडीच फुटाच्या दरम्यान होती.
तो वाघ एक बैल मारून त्याच्या मानेला पकडून ओढून नेत होता. तेवढ्यात आणखी दोन व्यक्ती मोटरसाईकिल वरून त्याच मार्गाने जात असतांना त्यांना थंबविले व काही क्षणातच एका जाणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबवून माहिती दिली.
प्रत्यक्ष वाघ त्या बैलाला मारून ओढून नेतांना दिसताच या सर्वांनी मिळून आरडाओरडा केला तेव्हा वाघ तिथून पळून गेला. ही घटना गावात सांगितली. ग्रामस्थांनी थोड्याच वेळात घटना स्थळावर गर्दी केली. या घटनेची वनविभागाला सुचना देण्यात आली.
वनविभागाच्या राऊंड ऑफिसर कन्नमवार यांनी आपल्या दोन चौकीदारासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची नोंद घेत पंचनामा केला असून वरिष्ठांना माहिती दिली आहे.
या वर्षातील वाकडी परिसरातील ही पहीलीच घटना आहे. मात्र वाकडी, शिवणी, गुरवळा, विहीरगाव, चांदाळा या परिसरात दोन मोठे वाघ व तीन बछड्यांचा वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षी या वाघांनी परिसरात धुमाकूळ घातला होता व मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राणी ठार केले होते.
शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी व वाघांचा बंदोबस्त करावा अशी या भागातील नागरीकांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here