मुंबई :
दिनांक 20 एप्रिल रोजी कोनगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकास मिळालेल्या गुप्त माहिती की नाशिक मुंबई बायपास हायवे रोड वासुरी हॉटेल समोर ठाकुरपाडा तहसील भिवंडी जिल्हा ठाणे येथे काही इसम यांच्याकडे असलेले पट्टेदार वाघा चे कातडी व पंजे विक्री करण्यास करिता येणार आहेत त्या अनुषंगाने कोनगाव कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास पथकातील अमलदार यांनी वन विभागाचे कर्मचारी व वार रेस्क्यु फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांच्यासह सापळा रचून चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पट्टेदार वाघाचे कातडे एकूण लांबी 49 इंच रुंदी 24 इंच पाच नख असलेला वाघाचा पंजा त्याची एकूण लांबी 6.6 इंच रूंदी 4.6 इंच, पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची ब्रिजा कार क्रमांक MH01 DE 9493 कीमत 8,00,000 लाख रु, काळ्या रंगाचे मारुती सुझुकी एक्सेस 125 cc क्रमांक MH 01 DV 8557 कीमत 50,000 रु जप्त करण्यात आले
आरोपी चे नाव प्रशांत सुशील कुमार सिंग वय 21, राहणार रूम नम्बर 305, बिल्ड़िंग नंबर 11 एस आर एस स्कीम, भक्ती पार्क आय मॅक्स सिनेमा जवळ, वडाळा, पूर्व मुंबई 37,
चेतन मंजे गोडा वय 23 राहणार रेड वूड बिल्डिंग ए विंग पहिला माळा, रूम नंबर 105, भक्ती पार्क आयमॅक्स सिनेमा जवळ, वडाळा, पूर्व मुंबई 37,
आर्यन मिलिंद कदम वय 23, राहणार ए / 604 सिल्वर आर्च, बी. एम. ए. डी. रोड, भक्ती पार्क आयमॅक्स सिनेमा जवळ, वडाळा, पूर्व मुंबई 37,
अनिकेत अच्युत कदम वय 25 राहणार जय भवानी शक्तिनगर, ए विभाग रूम नंबर 128, प्रज्ञा नगर D/19 च्या मागे सायन कोळीवाडा मुंबई यांना अटक करण्यात आली असून ग.रजि.नं. कोंनगांव पुलिस स्टेशन, भिवंडी गुन्हा रजि. नं. 109/2021 वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9, 39(3), 44, 48(A), 49(B), 59 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे
यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सो , पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला सो, अप्पर पोलीस आयुक्त सो, प.प्रा. वी. ठाणे अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त परी 2 भिवंडी, योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशांत ढाले सो, व. गा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे सो, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक पराग भाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वामन सूर्यवंशी, राजेश शिंदे, संतोष मोरे, विनायक मातरे, संतोष पवार, अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले व गणेश चोरगे यांनी केलेली असून वरिष्ठ यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे करीत आहेत.