पुनर्वसित डिचोली गाव प्रगतीच्या वाटचालीवर

0
428

सह्याद्री व्याघ्र राखीव व कोयना अभयारण्यातील अती दुर्गम अशा डिचोली गावाचे पुनर्वसन सन २०१४ साली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बाबरमाची वनक्षेत्रावर करण्यात आले आहे . डिचोली हे गाव महाराष्ट्र राज्यामधील एक आदर्श पुनर्वसित गाव ठरावे अशा पद्धतीने सर्व सोयी व सुविधायुक्त करण्यात आले आहे .

या गावातील महिला व पुरूष वर्गास रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता डिचोली गावामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन योजना राबविण्यात येत आहे .
नुकतेच या गावामध्ये महिलाना कापडी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सद्यस्थितीत प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे .   त्या दृष्टीने त्यांना ऑर्डर मिळण्यास सुरवात झाली आहे . तसेच गावामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन योजनेंतर्गत १०० टक्के एलपीजी गैस-सिगड़ी वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे व यामुळे वनउपजावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार व तसेच मानव व वन्यजीव संघर्षा वर आळा घालण्यास देखील मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here