तळोधी (बा.)
तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत सावरगाव येथील निस्तार लाकूड विक्री डेपो मध्ये वन विभाग द्वारे शवदहना करीता जलाऊ लाकडे ठेवले जातात. आणि या लाकडांवर शवदहना करीता परिसरातील तळोधी, वलनी, मेंढा, कन्हाळगांव, सावरगाव, चिखलगाव, नांदगाव, गिरगाव,वाढोणा, व इतर गावे अवलंबून आहेत. मात्र गेल्या 3-4 महीन्या पासून सावरगाव लाकूड विक्री डेपो मध्ये निस्ताराची लाकडे उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील लोकांची गैरसोय होत आहे. जंगलालगत च्या या गावातील गरजूंना शवदहना करीता जंगलात लाकडे शोधावी लागत आहेत. ज्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही ही लोकांची गैरसोय व परिस्थिती लक्षात घेऊन, वनविभागाच्या वतीने सावरगाव लाकूड विक्री डेपो मध्ये निस्ताराची लाकडे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन परिसरातील ‘स्वाब नेचर केअर संस्था’ द्वारे आज वनपरिक्षेत्र तळोधी (बा.) येथे देन्यात आले.
हे निवेदन वन परिक्षेत्र अधिकारी तर्फे, वन क्षेत्र सहाय्यक के. डी. गरमडे, वनरक्षक एस. बी. पेंदाम यांनी स्वीकारले. तर निवेदन देते वेळी ‘स्वाब नेचर केअर संस्थेचे’ संस्थापक-अध्यक्ष यशवंत कायरकर, कोषाध्यक्ष गोपाल कुंभले, सदस्य सर्परक्षक जिवेश सयाम, विकास बोरकर, योगेश गनफाडे, पत्रकार भारत चूनारकर उपस्थित होते.