नागपुर :
एनजीओ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 14 एप्रिल रोजी वनविभागाने पोपट आणि कासव विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली. यात तीन आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याजवळ 7 पोपट व 3 कासव जप्त करण्यात आले असून पोपट व कासवांना सेमिनरी हिल्स च्या टीटीसी (ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर) ला पाठविण्यात आले.
आरोपीचे नाव आदित्य गंगाधर पाटील, प्रशांत वासुदेव ढोले व तुषार शिंपी असे आहे. वन विभागाच्या तपास दरम्यान तुषार शिंपीच्या घरी धाड टाकण्यास 2 दोई जातीचे पोपट जप्त करण्यात आले व तसेच प्रशांत ढोले यांच्या घरुन 2 रुफड़ कासव व 1 सिंगापुर कासव मिळाले.
अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पकडण्यासाठी वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.
यावेळी मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर, एन्टी पोचींग टीम चे RFO आशिष निनावे, क्षेत्र सहायक मंगेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे, आशिष कोहळे, स्वप्निल बोधने पशु कल्याण अधिकारी, वन कर्मचारी आदी उपस्थित होते.
वन विभाग, एसआरपीएफ, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक यांचे प्रतिनिधी यांची १२ तासांची नॉनस्टॉप अस्वस्थ कारवाई मुळे चांगल्या समन्वयामुळे 7 पोपट आणि 3 कासव वाचविण्यात यशस्वी झाले.
अशा बेकायदेशीर व्यापाऱ्यांनी यापूर्वी विकल्या गेलेल्या अन्य पोपट आणि कासवांना वनविभागाने वाचविन्यात यश मिळाले.
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार भारतात आढळणारी कोणतीही वन्य प्राणी ठेवणे आणि विकणे हा गुन्हा आणि प्राणी क्रूरता आहे, म्हणून नागरिकांनी त्यांच्या करमणुकीसाठी वन्यजीवांना तुरूंगात न घालण्याची विनंती केली जाते. अन्यथा वनविभाग कडक कारवाई केली जाईल असे मत मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांनी व्यक्त केले.