ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबर 2020 पासून नियमांनुसार नैसर्गिक पर्यटन सुरू करण्यात आले होते मात्र कोविड विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय व्याघ्र यांनी सुचविल्यानुसार निसर्ग पर्यटन सावधगिरीने राबविन्यास सांगितले होते. वन कर्मचारी, मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांना कोरोना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई काल (१३ एप्रिल) रोजी जारी केलेल्या ”ब्रेक द चेन” अभियानातील निर्देशांनुसार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर मधील इको टूरिझम उपक्रम / वन्यजीव सफारी 15 एप्रिल 2021 पासून बंद राहील. 15 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत केलेल्या आगाऊ बुकिंगची संपूर्ण बुकिंग रक्कम www.mytadoba.org वर संबंधित बुकिंगच्या ई-वॉलेट मध्ये जमा होईल व ई-वॉलेट मधील रक्कम भविष्यातील 6 महिन्यांची वैध असेल.
वन समाचार चे प्रतिनिधी ताडोबातील कोकण पर्यटक मृगदा मैडम सोबत चर्चा केल्यास त्यांनी सांगितले की – हा CCF चा एक चांगला निर्णय आहे. त्याने प्रवाशांचा केवळ विचार केला नाही तर ड्रायव्हर्स आणि गाईडचा आरोग्य व सुरक्षित ते बद्दल विचार केले आहे. आम्ही या निर्णयाचा आदर करतो आणि जेव्हा परवानगी असेल तेव्हा प्रवास करू. ताडोबाचे नियमित पाहुणे म्हणून आम्हाला मार्गदर्शक व ड्रायव्हर्स सुरक्षित व निरोगी रहावेत अशी आमची इच्छा आहे.
तसेच ताडोबा प्रशासनाने पर्यटन विषयी माहितीसाठी पर्यटकांनी हेल्प लाईनशी संपर्क साधू शकतात. असे डॉ. जितेंद्र एस. रामगावकर IFS, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सगड्याना सूचित केले आहे.