मालेगांव वनवृतात दि.4 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून मालेगांव जिल्ह्यात नाशिक येथे मालेगांव बायपास रोड वरील हॉटेल स्टार मध्ये काही इसम सैंड बोआ जातीचे साप विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो चे सदस्य रोहन भाटे यांना मिळताच त्यांनी तात्काळ ती विभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर यांना दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ बनावट खरीदार तयार करून वनविभागाचे काही अधिकारी स्टार हॉटेल येथे पाठविले.
त्यांच्या कडे विक्रीसाठी आणलेले दुर्मिळ साप खात्री झाल्यावर त्यांना झडप घालून पकडण्यात आले.
सदर कारवाही मध्ये 4 आरोपी पकडण्यात आले आहेत.
सदर कारवाही साठी विभागीय वनाधिकारी जगदीश येडलावर, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो चे सदस्य रोहन भाटे, वनक्षेत्रपाल विलास कांबळे, यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर साप विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याचे खात्रीलायक माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना समजली होती. त्यांनी तत्काळ विभागीय वनाधिकारी यांना कळवून आरोपींना पैश्याचे आमिष दाखवून सतत त्यांच्या बरोबर वार्तालाब करून त्यांचे विश्वास संपादन करून त्यांना यशस्वीपणे पूर्व नियोजित सापळा लावलेल्या ठिकाणापर्यंत घेऊन येण्यास मदत केली.
विदेशामध्ये या सापापासून कर्करोग आणि लैंगिक शक्ती वाढविण्याची औषधी बनविण्याकरिता उपयोगी पडतो
त्यामुळे या सापाची किंमत मार्केटमध्ये करोडोची आहे.
या कामात श्री.रोहन मधुकर भाटे , मानद वन्यजीव रक्षक तथा सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी निर्माण केलेल्या स्थानिक गुप्तचर व्यवस्थेमुळे यशस्वीरित्या दुर्मिळ साप (१) याची सुटका करण्यासाठी व चार ( 4 ) आरोपींना अटक करण्यास मदत झाली.