
गडचिरोली :
आज 27 मार्च रोजी सकाळच्या सुमारास जंगल परिसरात एफ.डी. सी.एम. च्या कक्ष क्र. 2 मध्ये मोहफूल वेचण्याकरिता गेलेली महिलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली मृतकाचे नाव शोभा नामदेव मेश्राम राहणार राज घाटा माल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शोभा मेश्राम ही 26 मार्च रोजी जेप्रा लगतच्या जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेली होती मात्र ती घरी परत आली नसल्यामुळे काल ग्रामस्थानी तिचा शोध घेतला असता ती मिळाली नाही.
आज दिनांक 27 मार्च रोजी पुन्हा शोध घेण्यात आला तेव्हा वाघाने ठार केले असल्याचे निर्देशन आले
वाघाने महिलेला ठार केल्यानंतर एक ते दीड किलोमीटर आत ओढून नेल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी धाव घेतली व तसेच वनविकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच जंगलात जातात.मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांना आपापले जीव गमवावा लागत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच मागील चार महिन्यात अमिर्झा परिसरात वाघाने चार जणांना ठार केले होते वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा असे ग्रामस्थांचे मागणी आहे.
