घोन्सा-वणी : आज दिनांक 23 मार्च 2021 रोजी मंगळवारी घोन्सा सोनेगांव लगत आसन शिवारातील दिनेश लोहकरे शेतात जात असताना त्यांना नाल्यात वाघ दिसला त्यांनी लगेच ग्रामस्थांना सूचित केले. वनविभागाला याची माहिती मिळताच मालेगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे व मुकुटबन चे वनपरिक्षेत्र अधिकारी डी .जी. वारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पाच वर्षीय वाघीण असल्याचे सांगितल्या जात आहे. वाघिणीच्या गळ्यावर आढळलेले जखमा नेमकी कशाने झालेले आहे.
प्राप्त माहितीनुसार या परीसरात मागील दीड वर्षापासून वाघाचा वावर होता तसेच काही दिवस पूर्वी पशुधनावरील हल्ल्याचे प्रमाण देखील वाढलेले होते. चार-पाच दिवस आधी सिंधी वाढोना येथील शेतात काम करणाऱ्या तीन शेत मजूरावर वाघाने धडप घेऊन किरकोळ जखमी केले होते याबाबत वनविभागाकडे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केले होते. वाघिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याने वनविभागाचे अधिकारी कसून तपास करीत आहे.
: