कोल्हापूर येथे हस्ती दंत विकणारी टोळी पकडण्यात वन विभागाला यश

0
326

आज दि.10.03.2021 रोजी कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्ड जवळ हस्ती दंत घेऊन विक्रीसाठी य असल्याचे माहिती मिळाली. त्या आधारावर कोल्हापूर वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथक वनक्षेत्रपाल  युवराज पाटील, वनक्षेत्रपाल फिरते पथक सातारा सचिन डोंबळे, वन्यजीव अपराध नियंत्रण सदस्य तथा मा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सापळा रचला.

सदर आरोपी हे हस्ती दंत विक्री साठी घेऊन आल्यावर  खात्री झाल्यावर त्यांच्यावर झडप मारून कारवाही करण्यात आली.
त्यावेळेस एक इनोव्हा गाडी क्र MH09 AQ 6661, एक दुचाकी हिरो होंडा स्प्लेनडर MH 09 DW 4750
तीन मोबाईल संच तीन आरोपी, हस्ती दंत 3 नग (वजन 965 ग्राम ) असे सर्व जप्त करण्यात आले.

सदर आरोपी माणिक विलासराव  इनामदार  वय 59 रा.  परळी निनाई ता शाहूवाडी, सागर आबासाहेब साबळे वय 32 रा.माले ता पन्हाळा,धनंजय केरबा जगदाळे वय 21 रा. शिंगणापूर ता करवीर आहेत

सदर कारवाही मध्ये कोल्हापूर वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथक वनक्षेत्रपाल  युवराज पाटील, वनक्षेत्रपाल फिरते पथक सातारा सचिन डोंबळे, वन्यजीव अपराध नियंत्रण सदस्य तथा मा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वन्यजीव अभ्यासक हेमंत केंजळे,वनपाल गजानन भोसले,  रॉकी देसा, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, सुहास पवार, सागर पटकारे , वाहन चालक संजय मंडले ,दिनेश नेहरकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले, सुहास पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here