
आज दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 8 .00 च्या सुमारास सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत पाथरी उपवनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 16 79 मध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना उघडकीस झाली मृतकांची नाव दादाजी पांडुरंग मस्के राहणार डोंगरगाव वय 65 वर्षे आहे. प्राप्त माहितीनुसार दादाजी पांडुरंग मस्के जंगलात सरपनासाठी गेला असतांनी वाघानी हल्ला केला.
सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी वन विभागाला दिली वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येऊन मौका पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करीता पाठविण्यात आला.
या क्षेत्रात वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहेत तसेच या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे .वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
