ताडोबाची वनराणी

0
667

घनदाट वनराईने नटलेला चंद्रपूर जिल्हा. या हिरव्यागार वनराईच्या कुशीत असलेला ताडोबा म्हणजे जगभरातल्या पर्यटकांचं हृदय

स्थान. वाघा साठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात निडर पणे आणि आपल्या कौशल्यानं पर्यटकांना इत्यंभूत माहिती देणारी महिला फॉरेस्ट गाइङ म्हणजे शहनाज सुलेमान बेग. शहनाज या पहिल्या महिला गाईड आहेत शहनाज यांचा जन्मच ताडोबामध्ये झाला त्यामुळे वाघाची डरकाळी, पक्षांचा किलबिलाट असो की हिरवेगार वृक्ष. यांचे नाते तिला बालपणापासूनच रुजलेले आहे. विवाहा नंतर चंद्रपूर शहरात यावे लागले. मात्र तिचे मन सिमेंटच्या जंगलात रमत नव्हते. पशुपक्ष्यांवरील प्रेम, जंगलाबद्दलची आत्म्यियता तिला पुन्हा माहेरी घेऊन गेली. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता तो पती सुलेमान बेग. ताडोबाच्या जंगलात भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी महिला गाईड येथे नव्हती अनेक महिला प्रवाशांना पुरुष गाईड सोबत जाणे अवघडल्यासारखे वाटायचे अनेकांनी ही याबाबत बोलून दाखवले मात्र वन विभागाने फारसे मनावर घेतले नव्हते मात्र शहनाज नाही वनविभागाकडे विनंती केली तशी हिम्मत दाखवली आणि महिला गाईड म्हणून काम करण्याची संधी मागितली. तिने संधीचे सोने केले. ताडोबा सारख्या जगप्रसिद्ध प्रकल्पात ती पहिला महिला गाईड म्हणून रुजू झाली. तिचा हा आदर्श घेऊन अन्य तरुणी देखील जंगला सारख्या भयावह ठिकाणी गाईड म्हणून काम करण्यासाठी पुढे आल्यात. वन्य प्राण्याबद्दल असलेली इत्थंभूत माहिती, झाडांची नावे, पक्ष्यांच्या आवाजावरून जंगलातील संकेत तीअचूक ओळखत असते. तिच्या या कौशल्यामुळे अनेक पर्यटकांना ताडोबा विषयी प्रेम निर्माण होत आहे. तिच्या कर्तृत्वाबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाला होता. अनेकांनी भरभरून कौतुक केले. तिचा हा संघर्ष आजही सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here