चिंतल धाबा बिटात वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार*

0
888

पोंभूर्णा तालुक्यातील चॅकाता गावातील पुरुषोत्तम मडावी वय 52 वर्ष दिनांक 4 मार्च रोजी चॅकाता च्या जवळील जिच्या तलावात बैलाची जोडी घेऊन पाणी पाण्यासाठी गेला होता त्यावेळेस त्याच्यासोबत तीन व्यक्ती होते पुरुषोत्तम रात्री पर्यंत न आल्याने त्याचा शोध शोधा करण्यास रात्री 8 च्या सुमारास जंगलात गेले पण त्याचा काही शोध लागला नाही
आज दिनांक 5 मार्च रोजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत शोधाशोध केल्यावर चिंतल धाबा येथील कक्ष क्र. 96 राखीव जंगलात वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम मडावी  ठार झाल्याचे निदर्शनात आले.
वन विभागाने घटना स्थळी पंचनामा करून त्याला गोंडपिपरी येथे शवविच्छेदनासाठी  पाठविण्यात आले.
मृतकांच्या परिवाराला वन विभागा तर्फे आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी खोब्रागडे, ए सी एफ  कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव,  वनरक्षक आर. जी. मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, देवराव कडते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here